Home > News Update > इन्फोसिस देशद्रोही : RSS मुखपत्रातून आरोप आणि पलटी

इन्फोसिस देशद्रोही : RSS मुखपत्रातून आरोप आणि पलटी

इन्फोसिस देशद्रोही : RSS मुखपत्रातून आरोप आणि पलटी
X

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत असलेल्या 'पांचजन्य' साप्ताहिकाने सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या इन्फोसिसवर टीका केली आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि आयकर पोर्टलमधील त्रुटींवरून इन्फोसिस कंपनीवर टीका केली आहे. वस्तू आणि सेवा करासंदर्भातील दोन पोर्टल इन्फोसीस कंपनीने तयार केली आहेत. ही पोर्टल ठीक चालत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या आहेत.

काय म्हटलंय पांचजन्यमध्ये?

'साख और आघात' या शिर्षकाखाली लिहिलेल्या या लेखात देशाच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. 'इन्फोसिस'ने अनेकदा नक्षलवादी, डावे तसेच 'टुकडे टुकडे टोळीला' मदत केल्याचा आरोप या लेखात केला असून त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. असं देखील पांचजन्य मध्ये म्हटलं आहे.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नारायण मूर्ती यांचा वैचारिक विरोध

'इन्फोसिस' कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या विचारधारेला विरोध असल्याचं या लेखात स्पष्टपणे लिहिले आहे.

कॉग्रेसचा निशाणा...

कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी या लेखाला "देशद्रोही" म्हटले असून इन्फोसीसचं देशासाठी आणि जगासाठी मोठं योगदान असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे.

संघाचं स्पष्टीकरण

'इन्फोसिस'ने तयार केलेल्या वेब पोर्टलशी संबंधित काही मुद्दे असू शकतात, मात्र, 'पांचजन्य' मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखकाची ती व्यक्तिगत मतं आहेत, असं सघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख आंबेकर यांनी दिलं आहे.

Updated : 6 Sept 2021 11:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top