Home > News Update > राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा: संघकार्यकर्त्याची याचिका फेटाळली

राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा: संघकार्यकर्त्याची याचिका फेटाळली

राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा: संघकार्यकर्त्याची याचिका फेटाळली
X

`महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे,` या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या २०१४ च्या प्रचारसभेतील वक्तव्यावरुन संघकार्यकर्त्यांने मुंबई हायकोर्टात याचिका करुन भाषणाची सीडी पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्याची मागणी कोर्टानं आज फेटाळून लावली. ठाणे दिवाणी कोर्टानेही यापूर्वी सीडी पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्याची फेटाळून लावली होती. हायकोर्टाच्या न्यायमुर्ती रेवती डेरे यांनीही याच निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.

संघ स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी ही याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं संघाची प्रतिमा मलिन झाल्याचं याचिकार्त्याचं म्हणनं होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधीहत्येला जबाबदार असल्याचं, वक्तव्य केलं होतम. सुरवातील भिवंडी कोर्टामधे या याचिकेवर सुनावणी झाली होती. एकदा राहुल गांधी यांनी सुनावणीला हजेरी देखील लावली होती. सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी कोर्टापुढे निष्पाप असल्याचे सांगितले होते.

कोणत्याही परीस्थितीत वक्तव्यावर माफी मागणार नाही अशी त्यांची भुमिका होती. ठाणे दिवाणी न्यायालयानं याचिकार्त्यांनं सादर केलेली भाषणाची सीडी पुरावा म्हणुन ग्राह्य धरणार नाही असा निकाल दिला होती. मुंबई उच्च न्यायालयानं देखील हाच निर्णय कायम ठेवत राहूल गांधींना दिला दिला आहे.

Updated : 20 Sept 2021 5:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top