मोहन भागवत यांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणाले आता भिडे गुरुजींना विचारा!
मोहन भागवत यांना कोरोना, अमोल मिटकरी यांनी घेतील भिडेंची फिरकी...
X
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागपूरमध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. या मुख्यालयात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये नॉर्मल लक्षण आढळून आली आहेत. त्यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
मोहन भागवत यांना कोरोना झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी भिडे यांची फिरकी घेतली आहे.
"कृपया पत्रकार बांधवांनी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!" असा मिश्किल टोला लगावला आहे.
नक्की काय प्रकरण आहे?
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी अकलेचे तारे तोडत "मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.''
असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होते. यावर अमोल मिटकरी यांनी भिडेंवर निशाणा साधला आहे.
मागे एकदा सांगली जिल्ह्यातील आळसंद या गावात आमदार अनिल बाबर तसेच संभाजी भिडे एका दुकानाच्या उद्घाटन समारंभासाठी एकत्र आले होते. यावेळी भिडे यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना आधी मास्क काढा आणि मग उद्घाटन करा असे फर्मावले. आमदारांनी हा आदेश मानत स्वतःच्या तोंडावरचा मास्क उतरवला. गर्दीत होत असलेल्या या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क घातलेला नव्हता. व त्यांनी आमदारांना घातलेला मास्क देखील उतरवायला लावला होता.
कृपया पत्रकार बांधवानी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!@TV9Marathi@abpmajhatv@saamTVnews pic.twitter.com/3MTQjZfL4h
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 10, 2021