Home > News Update > आम्ही भिकारी नाही, मंत्रीपदावरून महादेव जानकर यांचा भाजपला इशारा

आम्ही भिकारी नाही, मंत्रीपदावरून महादेव जानकर यांचा भाजपला इशारा

आम्ही भिकारी नाही, मंत्रीपदावरून महादेव जानकर यांचा भाजपला इशारा
X

राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यासंदर्भात चर्चा सुरु असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आम्ही भिकारी नाही, असं म्हणत भाजपला इशारा दिलाय. नेमकं काय म्हणाले आहेत महादेव जानकर पाहूयात....

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. त्यातच महादेव जानकर यांना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपद मागणार का? असा सवाल विचारला असता आम्ही भिकारी नाही. आम्ही मागणारे नाहीत. कमांड देणारे आहोत. त्यामुळे आम्ही भाजपकडे महामंडळ किंवा मंत्रीमंडळ देण्याची मागणी करणार नाही. जर त्यांना मित्र पक्षाची गरज असेल तर त्यांनी आम्हाला मंत्रीपद द्यावं. महामंडळ द्यावं. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा मित्रपक्ष म्हणून आम्हाला सोडाव्यात. नाहीतर आम्ही आमच्या मार्गाने पुढे जायला तयार आहोत. आमच्या त्यांना शुभेच्छा, असं म्हणत महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिला आहे.

Updated : 26 Jun 2023 6:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top