Home > News Update > Maratha reservation : आठवलेंचा सल्ला 'असा सोडवा' आरक्षणाचा गुंता

Maratha reservation : आठवलेंचा सल्ला 'असा सोडवा' आरक्षणाचा गुंता

Maratha reservation : आठवलेंचा सल्ला असा सोडवा आरक्षणाचा गुंता
X

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. या ज्वलंत मुद्यावरून राजकारण सक्रिय झालेले आहे. मराठा आरक्षणाला सचर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. पण आरक्षणाचा हा तिढा सोडविण्यात सरकारला अद्याप यश मिळालेले नाही. मराठा आरक्षणावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आपली भूमिका मॅक्स महाराष्ट्रवरील मुलाखतीत स्पष्ट केली आहे.

या मुलाखतीत रामदास आठवले आठवले म्हणाले की "मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरून खळबळून जागं केलं आहे. sc, st, obc ना मिळणाऱ्या आरक्षणाप्रमाणे मराठ्यांना देखील आरक्षण द्यावं" पुढे बोलताना ते म्हणाले की "मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करण्याची आमची जुनी मागणी आहे. अर्थिक निकषावरील आरक्षण द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने तामिळनाडूत ६९ टक्के आरक्षण दिलं गेलं आहे त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारनं तामिळनाडूचा अभ्यास करावा" असं सुचक वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारबाबत देखील वक्तव्य केलं आहे. आठवले म्हणाले की "नरेंद्र मोदींना फक्त मराठा समाजाचा विचार करता येणार नाही. हा राज्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव आला तर आम्ही बघू असं वक्तव्य रामदास आठवलें यांनी केले आहे.


Updated : 9 Nov 2023 10:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top