तेरणा अभियांत्रीकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवला 'रोबोट मिस मास्की'
X
उस्मानाबाद :संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना , कोरोना रुग्णाकडे पाहण्याचा सख्या नातेवाईकांचाही दृष्टीकोन बदलला आहे. कोरोना रुग्णांच्या जवळ जाण्यासाठी जवळचे व्यक्ती देखील तयार होत नाहीत.त्यात कोरोनाला रोखण्यासाठी शासन प्रशासनाकडून नियम घातले गेले आहेत त्यात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नियमाचे पालन होते की नाही हे पाहणे कठीण झाले असताना, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून रोबोट मिस मास्की या तयार केला आहे .
सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर तो लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो. तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा आपल्याला हा रोबोट दाखवतो. तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागत सुद्धा करत आहे.
अस्थपनाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी प्रवेशद्वारावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते मात्र अशावेळी त्या व्यक्तीचा अनेकांशी संपर्क आल्याने त्या व्यक्तीला कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या रोबोटची निर्मिती केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
अत्यंत अल्प किंमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल. या विद्यार्थांना प्राचार्य व्ही व्ही माने , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस जी शिंदे , प्रोजेक्ट समन्वयक प्रा श्रीकांत अघोर ,प्रा अनिरुद्ध देशपांडे ,श्री व्ही डी पवार ,प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन केले. इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या रोबोटचे सर्वांकडून कौतुक होत आहे.