Home > News Update > मनमोहन सिंह अल्पसंख्यांक नव्हते? नेटकऱ्यांचा थरूर यांना सवाल...

मनमोहन सिंह अल्पसंख्यांक नव्हते? नेटकऱ्यांचा थरूर यांना सवाल...

After Shashi Tharoor tweet Manmohan Singh trends on Social media over UK PM Rishi Sunak minority Issue

मनमोहन सिंह अल्पसंख्यांक  नव्हते? नेटकऱ्यांचा थरूर यांना सवाल...
X

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि भारतात सगळीकडे त्यांचं कौतूक होऊ लागलं. ज्या ब्रिटनने भारतावर १५० वर्षांहुन अधिक काळ अदिराज्य गाजवलं त्याच देशाचा पंतप्रधान भारतीय वंशाची व्यक्ती होते यासाठी भारतीय आनंदात आहेत. पण याच पार्श्वभुमीवर सध्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंह ट्रेंड होत आहेत. पंधरा हजाराहुन अधिक लोकांनी मननोहन सिंह हे अल्पसंख्यांक नव्हते का असा प्रश्न ट्विटर वर विचारला आहे. पण मनमोहन सिंह अचानक का ट्रेंड झाले चला पाहुयात.

त्यांचं झालं असं की भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. अर्थात ब्रिटनमध्ये ते अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्या निवडीवर अनेकांनी ब्रिटनमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पण असं असलं तरी त्यांच्या निवडीवर अनेकांनी आनंद व्यक्त करत ब्रिटीश लोकशाहीचा अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. ब्रिटीश संग्रहालयाचे सदस्य जॉर्ज ऑस्बॉर्न यांनी ट्विट करत आपल्याला देशाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, "ऋषी सुनक हे दिवसअखेरीस पंतप्रधान होतील. काहींना वाटते, माझ्याप्रमाणे, तो आमच्या समस्यांवर उपाय आहे; इतरांना वाटते की तो समस्येचा एक भाग आहे. पण तुमचे राजकारण काहीही असो, आपण सर्वांनी प्रथम ब्रिटीश आशियाई पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा करूया आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगूया जिथे हे घडू शकते." असं म्हटलं आहे.

त्यांचं हे ट्विट कोट करत काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी एक विधान केलं आहे. त्यांनी ऋषी सुनक यांच्यासारख्या अल्पसंख्यांक व्यक्तीला पंतप्रधान केल्याबद्दल ब्रिटनचं कौतुक करायला हवं या आशयाचं ट्विट केलं. "असे घडल्यास, मला वाटते की आपल्या सर्वांना हे कबूल करावे लागेल की ब्रिटीशांनी जगात अत्यंत दुर्मिळ असे काहीतरी केले आहे, ऋषीसुनाक यांच्यासारख्या अल्पसंख्याक सदस्याला सर्वात शक्तिशाली कार्यालयात स्थान देण्यासाठी जसे आपण भारतीय आनंद साजरं करतोय. चला प्रामाणिकपणे विचारूयात आपल्या देशात हे होऊ शकते का?" असा सवाल त्यांनी विचारला. त्यांच्या य़ा प्रश्नावर नेटकऱ्यांनी त्य़ांना आता प्रतिप्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. मग मनमोहन सिंह कोण होते? ते अल्पसंख्यांक नव्हते का असे प्रश्न त्यांना विचारले जाऊ लागले आहेत.

न्युज एरेना या ट्विटर हॅंडलवरून शशी थरूर यांना सुनावण्यात आले आहे. "भारतात मनमोहन सिंग एक शीख पंतप्रधान होते आणि डॉ अब्दुल कलाम एक मुस्लिम राष्ट्रपती होते. ते 80% हिंदू बहुसंख्य राज्य करत होते आणि त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीवर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही. आम्हाला शिकवू नका." अशा शब्दात सुनावलं गेलं आहे.

अन्शुल सक्सेना यांनी देखील शशी थरूर यांना मनमोहन सिंह कोण होते असा प्रश्न विचारला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये जेव्हा ऋषी सुनक यांनी यूकेच्या पंतप्रधानपदाची शर्यत गमावली. भारतातील तथाकथित उदारमतवाद्यांनी गाय पूजेबद्दल त्यांची खिल्ली उडवली. आता ऋषी सुनक यूकेचे पंतप्रधान कधी होणार? भारताने यूकेकडून शिकावे आणि अल्पसंख्याक समुदायातून पंतप्रधान बनवावे, असे उदारमतवादी सांगत आहेत. मग मनमोहन सिंग कोण आहेत?" असं ट्विट करत त्यांनी शशी थरूर यांना प्रश्न विचारला आहे.

२००४ ला युपीएचं बहुमतात असताना सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यास देशभरातून विरोध केला गेला होता. त्यामुळे युपीएकडून त्यावेळी मनमोहन सिंह यांना पंतप्रधान म्हणुन नियुक्त केलं गेलं. मनमोहन सिंह हे शीख धर्मीय असून भारतासारख्या सर्वधर्मीय देशात ते अल्पससंख्यांक आहेत. त्यांच्या सोबतच तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलान हे देखील अल्पसंख्यांक होते. त्यामुळे शशी थरूर यांनी ट्विट करण्यास जरा घाई केली असंच म्हणावं लागेल.gets

Updated : 26 Oct 2022 6:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top