तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकून 'रिकी केज'ने इतिहास रचला; म्हणाले, "हा पुरस्कार भारताचा आहे
भारताकडुन 'रिकी केज' (Ricky Cage) ला तिसऱ्यांदा 'ग्रॅमी पुरस्कार' मिळावला आहे. तसेच त्यांना ‘डिव्हाइन टाइड्स’ (Divine Tides) या अल्बमसाठी ‘बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम’ (Best Immersive Audio Album) हा ग्रॅमी पुरस्कार 'रिकी केज' यांना यंदाचा वर्षी मिळाला आहे.
X
कोरोना महामारीनंतर covid19 यावर्षी संगीत जगतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक, 'ग्रॅमी पुरस्कार', लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा असा पुरस्कार आहे ज्याची संगीत जगाशी निगडित प्रत्येक कलाकार वाट पाहत असतो. या पुरस्कार सोहळ्यात संगीतकारांचा गौरव करण्यात आला. 'ग्रॅमी' ('Grammy') हा संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. भारताकडुन 'रिकी केज' (Ricky Cage) ला तिसऱ्यांदा 'ग्रॅमी पुरस्कार' मिळावला आहे. तसेच त्यांना 'डिव्हाइन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी 'बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम' (Best Immersive Audio Album) हा ग्रॅमी पुरस्कार 'रिकी केज' यांना यंदाचा वर्षी मिळाला आहे.
रिकी केज हे तिसऱ्यांदा ग्रॅमी जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. आणि हा पुरस्कार जिंकून रिकी केजने इतिहास रचला. त्यांनी केलेल्या या विक्रमामुळे जगासमोर सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. 65 व्या 'ग्रॅमी' पुरस्काराचे आयोजन ट्रेवर नोह यांनी केले होते. 'ग्रॅमी' अवॉर्डला 'ग्रामोफोन' अवॉर्ड असेही म्हणतात. म्हणूनच ग्रामोफोनची रचना त्याच्या बक्षीसात असते. पहिला 'ग्रॅमी पुरस्कार' ४ मे १९५९ रोजी झाला. यंदाचा ६५ वा 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळा अमेरिकेमधील 'लॉस एंजेलिस' (Los Angeles) शहरात पार पडल आहे.
2023 मध्ये, रिकीने 'डिव्हाईन टाइड्स'साठी (Divine Tides) सर्वोत्कृष्ट 'इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम'च्या श्रेणीमध्ये स्टीवर्टसोबत पुरस्कार शेअर केला. आणि दुसरीकडे, जगभरातील अनेक सेलेब्स आहेत ज्यांना यावर्षी हा सन्मान मिळाला आहे. 'सॉन्ग ऑफ द इयर पुरस्कार' 'बोनी रैट' यांना 'जस्ट लाइक दॅट'साठी 'ग्रॅमी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तिने या प्रकारात 'टेलर स्विफ्ट'ला मागे टाकले. भारतातील प्रसिद्ध सितारवादक 'पंडित रविशंकर'(Pandit Ravi Shankar) यांची धाकटी मुलगी अनुष्का शंकर (Anushka Shankar) पुन्हा एकदा 'ग्रॅमी' स्पर्धेचा अंतिम टप्पा पार करू शकली नाही. याआधी अनुष्काला सात वेळा नॉमिनेट केले गेले आहे, परंतु प्रत्येक वेळी हा पुरस्कार मिळवण्यात ती चुकली.