सांगलीतील हरिपूरात रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचे आयोजन...
X
आपण रिक्षा दरवेळी सरळ चालताना पाहिली आहे. मात्र कधी रिक्षा रिव्हर्स चालताना क्वचितच पाहायला मिळते. हेच लक्षात घेवून रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचे आयोजन सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे करण्यात आले होते.
रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचे आयोजन सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळपास ८९ रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षांसह सहभाग घेतला होता. रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या रिक्षा वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय आणि सजवण्यात आल्या होत्या. हजारो प्रेक्षकांच्या गर्दी मधून रिक्षा त्याही रिव्हर्स चालवण्याचा एक वेगळाच छंद सांगलीतील रिक्षा चालकांनी जोपासला आहे. अत्यंत अटी तटीच्या या थरारक स्पर्धेत शशिकांत पाटील या रिक्षा चालकाने अवघड वळणाचे तीन किलो मीटरचे अंतर फक्त ३ मिनिट ०८ सेकंदात पार करून विजेतेपद पटकावले. शशिकांत पाटील यांना रोख ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह आयोजकांकडून देण्यात आले.
या स्पर्धेचा स्थानिकांनी मनमुरादपणे आनंद लुटला. यावेळी विविध प्रकारच्या सजवलेल्या रिक्षा पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली. अनोख्या पद्धतीने रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा सजवल्या आहेत. त्यांनी आपल्या रिक्षांना विविध नावे सुद्धा दिली आहे. रिक्षा चालकांनी आपल्याला आपली रिक्षा सर्वामध्ये वेगळी दिसावी आणि ती जिथे कुठेही उभी असेल तिथे लोकांनी त्यांच्याकडे पाहात राहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे ग्राहकही सजवलेल्या आणि अनोख्या दिसणाऱ्या रिक्षाकडे आकर्षित होत असल्याचे रिक्षा चालक सांगतात. ज्या रिक्षाच्या जीवावर आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. ती आपली लक्ष्मी असल्याचे समजून त्याची निगा राखणे आणि काळजी घेणे, हे प्रत्येक रिक्षाचालक आपले कर्तव्य समजतो. अशी प्रतिक्रीया रिक्षाचालकांनी व्यक्त केली.