Home > News Update > #ResignModi: मोदींच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड, काय म्हटलंय नेटिझन्सनी

#ResignModi: मोदींच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड, काय म्हटलंय नेटिझन्सनी

#ResignModi: मोदींच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड, काय म्हटलंय नेटिझन्सनी
X

#ResignModi: मोदींच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड, काय म्हटलंय नेटिझन्सनी #ResignModi trends in India on Twitter देशात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. आज देशात 19 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 1 हजार 619 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशावर इतकं मोठं संकट आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. असं म्हणत नेटिझन्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनामा द्या. असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. या ट्रेन्डमध्ये 2 लाख 79 हजार लोकांनी ट्विट केले आहेत. दीदी के बोलो या व्हिरिफाइड अकांउट वरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटर अकांउटवरून एक कविता ट्वीट करण्यात आली आहे. या कवितेतून मोदींवर निशाणा साधला आहे.

ट्रायबल आर्मी या ट्विटर अकांउटवरून स्मशानघाटाचा एक फोटो ट्विट करण्यात आला असून याला जबाबदार कोण असं कॅप्शन देण्यात आलं आहे. लता आहुजा यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं असून हे चित्र आपल्या देशाची परिस्थिती सांगण्यासाठी पुरेसं असल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राहुल जोशी नावाच्या व्यक्तीने भाजपच्या कमळाचा फोटो ट्वीट केला असून त्या फोटोला 'अब की बार अंतीम संस्कार' असं कॅप्शन दिलं आहे. व्ही. एस सार्थी कुमार यांनी एक फोटो ट्वीट केला असून या ट्वीट मध्ये पीएम केअर फंडचं काय झालं असा सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे. अशाच स्वरुपाचे लाखो ट्वीट लोकांनी #ResignModi असं लिहून केले आहेत.

Updated : 19 April 2021 9:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top