Home > News Update > Republic Day: दिल्लीतही महाराष्ट्राचाच डंका, महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वाधिक लोकप्रिय

Republic Day: दिल्लीतही महाराष्ट्राचाच डंका, महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वाधिक लोकप्रिय

प्रजासत्ताक दिनानिमीत्त राजपथावर झालेल्या संचालनात यंदाही महाराष्ट्राचा डंका कायम राहिला. तर महाराष्ट्राच्या चित्ररथ सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ ठरला आहे.

Republic Day: दिल्लीतही महाराष्ट्राचाच डंका, महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वाधिक लोकप्रिय
X

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देशभरातील निवडक चित्ररथांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये सहभागी चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ पुरस्कार तर उत्तर प्रदेशचा चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमीत्त राजपथावर होणारे चित्ररथाचे संचालन डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण असतो. त्यामध्ये यंदा देशभरातील 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे एकूण 21 चित्ररथ सहभागी झाले होते. त्यामध्ये उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट चित्ररथ ठरला. तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला पब्लिक चॉईस अवॉर्डने गौरवण्यात आले. याबरोबरच सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलिस फोर्समधील चित्ररथ म्हणून गौरविण्यात आले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

या चित्ररथांपैकी भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला आहे. तर सर्व सेवा दलांमधील लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरविण्यात आले आहे. तसेच 9 मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या चित्ररथांना विभागून पुरस्कार देण्यात आले आहेत.

सर्वोत्कृष्ठ चित्ररथ ठरलेल्या उत्तरप्रदेशच्या चित्ररथावर वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा करण्यात आला होता. तर महाराष्ट्राच्या चित्ररथावर जैवविविधतेची मानके असलेल्या कास पठारचा देखावा करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच जैवविविधतेची मानके दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये राज्यासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या 22 वनस्पती आणि 15 प्राण्यांचा समावेश करण्यात आला होता. तर या चित्ररथासाठी ऑनलाईन लोकांचे मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये देशभरातील लोकांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंती दर्शवली. त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला पब्लिक चॉईस अवार्ड मिळाला.

महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची होती. तर या चित्ररथाला प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता.

Updated : 4 Feb 2022 4:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top