Republic Day 2021: Maharashtra Chitrarath मधून संत परंपरेचं दर्शन
काय आहे महाराष्ट्राच्या चित्ररथाची वैशिष्ट्ये? पाहा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Jan 2021 11:44 AM IST
X
X
आज दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्रातील संतपरंपरेचं दर्शन घडलं. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथातून महाराष्ट्रातील संत परंपरा दाखवण्यात आली. या चित्ररथात संत ज्ञानेश्वर, गोरोबा काका, मुक्ताबाई, जनाबाई अशा 17 मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा समावेश करण्यात आला आहे.
चित्ररथाच्या सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची मुर्ती आहे. तर मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह संत तुकाराम महाराज यांचा पुतळा आहे. तर शेवटी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठूरायाची मुर्ती आहे.
कोणी तयार केला चित्ररथ?
हा चित्ररथ तयार विदर्भातल्या 8 कलाकारांनी तयार केला आहे. यामध्ये यवतमाळचे प्रवीण किल्लारे, अमरावतीचे शिवप्रसाद प्रजापति, पातुरचे शिल्पकार विनय बगळेकर यांचा समावेश आहे.
Updated : 26 Jan 2021 11:47 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire