Exclusive: 'रेणू शर्माचं कमबॅक'; ट्विट करत म्हणाली...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 10 March 2021 1:06 PM IST
X
X
मुंबई: सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी गायिका रेणू शर्माने ट्वीट करत पुन्हा एकदा 'त्या' प्रकरणात नवीन ट्विस्ट आणलं आहे.
रेणू शर्माने बुधवारी सकाळी 11 वाजून 14 मिनिटाला एक ट्विट केलं आहे. ज्यात रेणू म्हणते की,ज्यांनी मला हनी ट्रॅप ब्लॅकमिलर म्हंटलं होतं, त्यांच्या कुटुंबातील महिला हेच करत असतील, त्यामुळे माझ्यावर असे आरोप थोपण्यात आले.
तर रेणूने केलेल्या ट्विटवर 'पुणेरी' नावाच्या एका अकाऊंटवरून, मग तुम्ही तक्रार मागे का घेतली,लढायला पाहिजे होते तुला सुद्धा न्याय मिळाला असता? असा प्रश्न उपस्थित केला. त्यालाच उत्तर देताना रेणू म्हणते की,मला कोण न्याय दिला असता?
त्यामुळे रेणू शर्माने केलेल्या या ट्विटवरून ती अजूनही आपल्या आरोपावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणात काही घडामोडी घडल्यास धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात.
Updated : 10 March 2021 1:07 PM IST
Tags: Renu Sharma Dhanjay Munde
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire