Home > News Update > कार्ल मार्क्स आजही जिवंत आहे.

कार्ल मार्क्स आजही जिवंत आहे.

समाज हा विचाराने चालतो. विचारवंताचा मृत्यू झाला तरी विचार स्वरुपात ही माणसं आपल्यात आजही जिवंत राहतात. महात्मा गांधींचा खून करणाऱ्यांना त्यांचा विचार मारता आला नाही. त्या प्रमाणे कार्ल मार्क्स आपल्यातून जाऊन अनेक वर्षे झाली आहेत. तरीही त्यांचा विचार जगामध्ये जिवंत आहे.

कार्ल मार्क्स आजही जिवंत आहे.
X

समाज हा विचाराने चालतो. विचारवंताचा मृत्यू झाला तरी विचार स्वरुपात ही माणसं आपल्यात आजही जिवंत राहतात. महात्मा गांधींचा खून करणाऱ्यांना त्यांचा विचार मारता आला नाही. त्या प्रमाणे कार्ल मार्क्स आपल्यातून जाऊन अनेक वर्षे झाली आहेत. तरीही त्यांचा विचार जगामध्ये जिवंत आहे. या विचाराला 'मार्क्सवाद' म्हणतात.


कार्ल मार्क्सची जयंती त्या निमित्ताने मॅक्समहाराष्ट्रने ज्येष्ठ लेखक डॉ. राम पुनियानी यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान कसं विज्ञानवादी आणि जमाखोरी करणाऱ्या लोकांच्या विरोधात होतं. याची माहिती दिली.

पुढे राम पुनियानी सांगतात की,

5 मे कार्ल मार्क्स यांची जयंती... 203 वर्षांपूर्वी कार्ल मार्क्स यांचा जन्म जर्मनीमधील एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांकडील दोन्ही कुटूंब हे ज्यू रब्बी विचारांचे होते. परंतु कार्ल मार्क्स यांनी समाजात आपली वेगळी विचारसरणी विकसित केली. त्यांची विचारधारा ही विज्ञानांवर आधारित होती.

जगातील थोर विचारवंतामध्ये त्यांचं नाव आजही आर्वजून घेतलं जातं. जर्मनीत हुकूमशाही आणि लोकशाही यांच्यात संघर्ष सुरु होता. त्यावेळी कार्ल मार्क्स यांनी सर्वात प्रथम 'फ्री प्रेस' ची मागणी करत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असा ठाम विचार मांडला होता. यावेळी जर्मनीतल्या राजेशाही, हुकूमशाही विरोधात त्यांनी कडाडून विरोध केला होता.

जगात सुरु असलेल्या अंधविश्वासाला थारा न देता समाजाला वैज्ञानिकदृष्टी कार्ल मार्क्स यांनी दिली. राजकारण, अर्थशास्त्र, समाजकारण मानवीदृष्ट्या असलेल्या सगळ्या क्षेत्रात ते वैचारिकरित्या असायचे.

मजूर, श्रमिक आणि स्वातंत्र्यांच्या आंदोलनात कार्ल मार्क्स यांच्या एका विचारधारेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पैशांची निर्मिती कामगारांच्या श्रमातून होते. त्यांच्या एका विचाराने कामगारांच्या प्रश्नाला विचारचं बळ मिळालं.

मजूरांच्या संघटनेतून जगात समाजवाद येईल. ज्याला आपण आज कम्युनिस्ट सोसायटी म्हणून ओळखतो. कम्युनिस्ट सोसायटीचा आधार म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अधिका-धिक लोकांनी संघटित होऊन लोकशाही पद्धतीने आपल्या समाजातच्या नीतिप्रमाणे विचार करतील. हा मार्क्स यांचा मुख्य विचार होता ज्याला त्यांनी 'कम्युन' म्हणून संबोधलं. आणि कम्युनवर आधारित असलेल्या सोसायटीला त्यांनी कम्युनिस्ट सोसायटी म्हटलं आहे.

दरम्यान,

आपल्याला कसा समाज हवा याविषयी कार्ल मार्क्स यांचे विचार काय होते? यावर ज्येष्ठ लेखक डॉ. राम पुनियांनी सांगतात की,

कार्ल मार्क्स यांच्यामते लोकशाही पूर्ण समाज हवा. समाजातील कामगारांचं, शेतकऱ्यांचं शोषण थांबवावं. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं आणि लोकशाही अधिक बळकट कशी करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. समाजातली सद्यपरिस्थिती पाहता मार्क्स यांच्या विचारांची आजही समाजाला अधिक गरज असल्याचं पुनियानी यांनी म्हटलं आहे.

तसेच कार्ल मार्क्सचे समाजातील धर्माबद्दल काय विचार होते? कम्युनिस्ट पक्षांची निर्मिती कशी झाली? कम्युनिस्ट पक्षांमध्ये हुकुमशाही कशी आली? कम्युनिस्ट विचार आणि माओंचे विचार यात काय फरक आहे? मार्क्सवादी विचारसरणीचा भारताच्या दलित समाजावर काय परिणाम झाला? यासंदर्भात राम पुनियानी काय सांगतात जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ...


Updated : 6 May 2021 12:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top