उ. प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन, बीडच्या तरुणाला अटक
X
उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीरपणे काही तरुणींचे धर्मांतर घडवून आणण्याच्या आरोपाखाली तीन तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलीय. यात बीडच्या इरफान शेख नावाच्या तरुणाचा समावेश आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान शेख हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणचा आहे. तो सध्या दिल्लीमध्ये राहतो. तो दिल्लीत केंद्र सरकारच्या नोकरीत असल्याचे सांगितले जाते. इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उ. प्रदेश सरकारच्या एटीएसने ताब्यात घेतलेले आहे.
इरफानच्या कुटुंबियांचे म्हणणे काय?
इरफान मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथील रहिवासी आहे. सिरसाळा इथंचं त्याचं प्राथमिक शिक्षण झालंय. सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय. अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये इरफानचं नाव आल्यामुळे त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. इरफान असे करू शकत नाही, असे त्याच्या भावाने सांगितले आहे. चौकशी करुन सत्य बाहेर आलेच पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी इरफानचं उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपीठावर कौतूक केले होते असेही त्याच्या भावाने सांगितले आहे.