#SCAM शिपिंग कंपनीत नोकरीच्या आमिषाने दीड लाखाचा गंडा
X
ठाणे शिपिंग मध्ये नोकरी देण्याच्या अमिषापोटी २३ वर्षीय तरुणाला तब्बल दीड लाखाचा गंडा घातल्या प्रकरणी फिर्यादी ओमकार पाटील यांनी आरोपी रजत पवार याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ओमकार शिवाजी पाटील (२३) रा. कोनगाव, कल्याण याला आरोपी रजत पवार आणि एका अनोळखी महिलेने मार्च २०२२ पासून एस आर मरीन कंपनी, इटरनीटी मॉल, ठाणे याठिकाणी फिर्यादीसह अन्य मुलांना परदेशात शिपिंग कंपनीत नौकरी लावण्याच्या अमिषापोटी तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम रोख, चेकने व गुगल पे व्दारे स्वीकारून नोकरी लावलीच नाही आणि पैसेही परत न दिल्याने अखेर आरोपी रजत पवार आणि सुर्तिका राणे या महिलेवर वागळे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
खोटे आणि बोगस विमान टिकटं आणि व्हिसा देऊन मुंबई आणि दिल्लीत बोलवण्यात आलं. तसचं हॉटेलचा खर्च स्वतः कारायला लावला. पैसे नंतर दिले जातील असंही सांगण्यात आलं. परंतू विमानतळावर गेल्यावर टिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे समजले दरम्यान आरोपी रजत पवार आणि सुर्तिका राणे यांनी फोन बंद केले. अशा पध्दतीने अनेकांची फसवणुक झाली आहे.
ठाणे शिपिंग मध्ये नोकरी देण्याच्या अमिषापोटी अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. मोठ्या पाठपुराव्यानंतर रजत पवार याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी ओमकार शिवाजी पाटील (२३) रा. कोनगाव, कल्याण याला आरोपी रजत पवार आणि एका अनोळखी महिलेने मार्च २०११ पासून एस आर मरीन कंपनी, इटरनीटी मॉल, ठाणे याठिकाणी फिर्यादीसह अन्य मुलांना परदेशात शिपिंग कंपनीत नोकरी लावण्याच्या अमिषापोटी पैसे घेतल्याचा आरोप आहे. सर्व रक्कम रोख, चेकने व गुगल पेव्दारे स्वीकारून नोकरी लावलीच नाही आणि पैसेही परत न दिल्याचा आरोप आहे. रजत पवार आणि सुर्तिका राणे या महिलेवर वागळे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.