Home > News Update > परभणी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद

परभणी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद

परभणी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद
X

परभणी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून पडत असलेला सततचा पाऊस व अनेक वेळा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळातील बाभळगांव मंडळ हे अधिक प्रभावित झाले. काढणीसाठी आलेले सोयाबीन हे मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. या भागात दिवस रात्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस सुरू असल्याने शेतीत कोणत्याही प्रकारची कामे करता येत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. काढणीचे पीक पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पाथरी तालुक्यात पडत असलेल्या पाऊसाने पिकांचे पुन्हा पुन्हा नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पाथरी तालुक्यातील गोदापात्रावर बांधण्यात आलेले उच्च पातळी बंधाऱ्यातून अनेक वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. उभ्या पिकात पाणी शिरल्याने पिकांना कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच बाजारात सोयाबीनचे भावही पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली जात आहे.

बाभळगांव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच बाभळगांव मंडळातील पिक पहाणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Updated : 28 Sept 2021 1:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top