Home > News Update > महाराष्ट्रात कोरोना संकटाचा महाविस्फोट

महाराष्ट्रात कोरोना संकटाचा महाविस्फोट

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येत्या दोन दिवसात राज्यभर कठोर निर्बधांचा इशारा दिल्यानंतर आजा राज्यात कोरोना संकटाचा महाविस्फोट झाला आहे. आज पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आता पर्यंतची सर्वोच्च उसळी घेतली आहे.चोवीस तासात 47 हजार 827 रुग्णांची आज राज्यात नोंद झाली असून 202 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंदीनं राज्यात पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोना संकटाचा महाविस्फोट
X

आज दिवसभरात राज्यात तब्बल 47 हजार 827 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढून राज्यात तब्बल 202 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.62 टक्के असून मृत्यूदर 1.91 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 29,04,076 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,57,494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईला कोरोनाचा उद्रेक

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 43,23,367 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 3,619,85 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 57,687 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

ठाण्यात आतापर्यंत 6,087 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,49,355 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 2,98,204 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 6,087 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 45,033 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यात तब्बल 70,751 रुग्णांवर उपचार सुरु

पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 70,751 रु9 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8,373कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 55,3413 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 4,74,141 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा सर्वोच्च संसर्ग

मुंबई शहरात आज दिवसभरात 8,844 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथे दिवसभरात 3,130 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात मुंबईत 19 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,32,367 वर पोहोचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,61985 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 57,687 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,727 जणांचा मृत्यू झाला आहे.

टास्कफोर्सच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनडच्या तयारीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आज झालेल्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी दोन दिवसाचा अलर्ट दिला आहे.

परंतु कडक लॉकडाऊन असावा अशी अपेक्षा मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील आता संभ्रमावस्थेत असले तरी मुख्यमंत्री कठोर निर्णय लावतील हे आता नक्की झालं आहे.



Updated : 2 April 2021 9:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top