Home > News Update > मंदिर-मदिरा एकत्र करणाऱ्यांचा निषेध: वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील

मंदिर-मदिरा एकत्र करणाऱ्यांचा निषेध: वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील

मंदिर आणि मदिरा एकत्र करण्याची गल्लत काही समाजकंटक करत आहेत. ज्यांना वारकरी संप्रदायाची शिकवण नाही तेच कोरोना संकटात मंदिर उघडण्याची मागणी करतील,अशा शब्दात वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी टीका केली आहे.

मंदिर-मदिरा एकत्र करणाऱ्यांचा निषेध: वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील
X

विधान भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी परिषदेच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्यानंतर ते मॅक्स महाराष्ट्र शी संवाद साधत होते.

विठ्ठल पाटील म्हणाले, मंदिर सुरू करण्याचे राजकारण करण्याचे षड्यंत्र वारकरी संप्रदायात कडून हाणून पाडले जाईल. समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत आमच्या भावनेशी खेळतात का?

मंदिर खुले करून लोकांना संकटात नेण्याची मागणी कोणी करू नये. शासनाने योग्य निर्णय घेऊनच मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे विठ्ठल पाटील यांनी सांगितले.

मंदिर उघडून गर्दी करता कामा नये आणि भावनेला अतिरेक होता कामा नये. वारकरी संप्रदायाची परंपरा ज्यांना कळते ते कधीच अताताई मंदिर उघडण्याची मागणी करणार नाही.

देव मंदिरात नसून देव माणसाच्या अंतरंगात असतो.

प्रत्येक जीव हा महत्वाचा आणि सज्जन आहे त्यांना जीव धोक्यात घालून हे योग्य नाही असेही विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले.

वारकरी च्या प्रश्नांना व्यासपीठ देऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांनी यावेळी राज्य सरकारचे अभिनंदन केले.

Updated : 8 Sept 2021 6:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top