Home > News Update > २३ जानेवारी पासून एअर इंडियाची सूत्र टाटांकडे सुपूर्द करण्याची तयारी

२३ जानेवारी पासून एअर इंडियाची सूत्र टाटांकडे सुपूर्द करण्याची तयारी

२३ जानेवारी पासून एअर इंडियाची सूत्र टाटांकडे सुपूर्द करण्याची तयारी
X

मुंबई : एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण झाल्यानंतर तिच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, २३ जानेवारी २०२२ पासून एअर इंडियाची सूत्र टाटांकडे सुपूर्द करण्याचे नियोजन असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या समभाग खरेदी करारानुसार, २३ जानेवारी २०२२ पर्यंत एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआय-सॅट्सची हिस्सेदारी नियंत्रित करण्यासह विमान प्रचलनाची जबाबदारी टाटा समूहाने हाती घ्यायची आहे. सोबतच स्वामित्व हस्तांतरणासाठी सुरू असलेल्या तयारीबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही सरकारने दिलेत.

पुढील काही दिवसात टाटा समूहाकडून एअर इंडियाचे संचलन केले जाणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप सेवा योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे ही विमान कंपनी किफायतशीर सेवा देईल की मेगा एअरलाईन म्हणून कार्यरत राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच नव्या व्यवस्थापनाची संरचना, कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण आणि केबिन अपग्रेड योजनेबाबत उत्सुकता कायम आहे.

Updated : 11 Nov 2021 9:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top