Home > News Update > शेतकऱ्यांची ऊसाची बील थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, रयत क्रांती संघटनेचं हलगीनाद आंदोलन

शेतकऱ्यांची ऊसाची बील थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, रयत क्रांती संघटनेचं हलगीनाद आंदोलन

शेतकऱ्यांची ऊसाची बील थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, रयत क्रांती संघटनेचं हलगीनाद आंदोलन
X

सोलापूर : ऊस बिल थकविणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले. मागील वर्षाची थकीत ऊस बिलाची एफआरपी पूर्ण न करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालय येथे हलगीनाद आंदोलन करण्यात आले.

मोहोळ तालुक्यात तीन ऊस कारखाने असून मागील ऊस गळीत हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाची पूर्ण रक्कम या कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दिली नाही. ती रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी. यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

मागील २ वर्षापासून कोरोना महामारीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. कारखान्यांनी ऊसाची एफआरपी एक रकमी देण्याचे बंधनकारक असून अद्यापपर्यंत कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. त्या संदर्भानुसार कारखान्यावर आरआरसी कायद्यानुसार कारवाई करून एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. अशी मागणी आंदोलना दरम्यान रयत क्रांती संघटनेने केली आहे.

यावेळी मॅक्स महाराष्ट्र्रशी बोलताना रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुहास पाटील म्हणाले की, थकीत एफआरपी ची रक्कम कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिली पाहिजे.चालू हंगामातील ऊसाची बिले शेतकऱ्यांना एक रकमी देण्यात यावी.या व इतर मागण्यासाठी आज आम्ही मोहोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचा हा उद्देश आहे की,या हलग्यांचा आवाज कारखानदारांच्या कानामध्ये,संचालकांच्या कानामध्ये गेला पाहिजे. शेतकऱ्यांची ही आर्त हाक आहे.

आज शेतकरी भुकेने मरायला लागलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जर कारखानदारांनी पैसे लवकर जमा केले तर शेतकऱ्यांला त्याच्यावर आलेले जे संकट आहे ते लवकर दूर करता येईल. शेतकऱ्यांवर कर्जाचे संकट, शैक्षणिक संकट, वैद्यकीय तसेच शेती जोपासण्यासाठी त्याला शेतीवरचा भार कमी करायचा आहे. त्याच अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील कारखानदारांनी थकीत एफआरपी ची रक्कम त्वरित शेकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रा.पाटील यांनी दिला आहे.

Updated : 29 Sept 2021 5:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top