कशेडी घाटात मोठा अपघात; खासगी बस ५० फूट खोल दरीत कोसळली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा अपघात झाला आहे. ही बस सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. भोगाव गावाजवळ आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर पंधरा जण जखमी झाले. एकूण ३१ प्रवासी यामधून प्रवास करत होते.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 31 Dec 2020 12:04 PM IST
X
X
मुंबई हून कणकवली येथे निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला हा अपघात झाला. पोलादपूर पोलीस तसेच महाड येथील साळुंखे रेस्क्यू टिम अपघात स्थळी वेळेवरती पोहोचल्याने बसमध्ये अडकलेल्या तीस जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले.
जखमींवरती पोलादपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच '१०८' रुग्णवाहिका व एका स्वयंसेवी संस्थेची रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचली. मदतकार्य अद्यापही सुरू आहे.गाडीतील बहुतेक प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील आहेत. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
Updated : 31 Dec 2020 12:04 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire