शिधापत्रिका अभियानाचा हजारो नागरीकांनी घेतला लाभ तेर मंडळात अभियानाचा समारोप
उस्मानाबादच्या ११ मंडळात दिशा समितीच्या निर्देशानुसार उस्मानाबाद पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रिका दुरुस्ती व वाटप अभियान घेण्यात आले. शासनाच्या या अभिमानाचे नागरिकांनी स्वागत करत आभार मानले.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Aug 2021 5:20 PM IST
X
X
उस्मानाबाद : दिशा समितीच्या निर्देशानुसार उस्मानाबाद पुरवठा विभागाच्या वतीने ९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान तालुक्यात मंडळनिहाय शिधापत्रिका अभियान राबविण्यात आले. उस्मानाबादच्या ११ मंडळात हे शिबीर संपन्न झाले असुन याचा समारोप आज तेर मंडळात करण्यात आला. या शिबीरात जिर्ण शिधापत्रिका बदलुन देणे , नाव कमी करणे, नवीन नावाचा समावेश करणे आदी कामे करण्यात आली.
शिबीरात उत्कृष्ठ काम करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांचा सत्कार करून प्रातिनिधीक स्वरूपात शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. या शिबीराचा हजारो नागरीकांनी लाभ घेतल्याची माहिती पुरवठा विभागाचे नाईब तहसिलदार केलुरकर यांनी दिली .
या अभियानामुळे शिधापत्रिका अभावी योजनांचा लाभ घेता येत नसणाऱ्यांना फायदा होत असल्याने शासनाच्या अभियानाचे नागरिकांनी स्वागत करत आभार मानले आहे.
Updated : 20 Aug 2021 5:20 PM IST
Tags: Osmanabad
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire