Home > News Update > रॅस्मस होजलंडचे सलग सहा प्रीमियर लीग सामन्यात गोल; ठरला असे करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.

रॅस्मस होजलंडचे सलग सहा प्रीमियर लीग सामन्यात गोल; ठरला असे करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.

रॅस्मस होजलंडचे सलग सहा प्रीमियर लीग सामन्यात गोल; ठरला असे करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.
X

रॅस्मस होजलंडच्या (Rasmus Hojlund) सुरुवातीच्या दोन गोल ने रविवारी ल्युटन टाऊन येथे मँचेस्टर युनायटेडला 2-1 असा काहीसा सोपा प्रीमियर लीग विजय मिळवून दिला आणि त्यांना लीग क्रमवारीत टॉप चारच्या लढतीच्या जवळ नेले.

रॅस्मस होजलंडने लुटन टाऊनच्या डिफेन्स कडून झालेल्या चुकितून संधी साधत युनायटेडला 37 सेकंदांनंतर आघाडी मिळवून दिली आणि नंतर केवळ सात मिनिटानंतरच 2-0 अशी आघाडी घेतली.

21 वर्षीय खेळाडूने आता सलग सहा प्रीमियर लीग सामन्यात गोल केले आहेत - असे करणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.

रेलीगेशन च्या दरावर असलेल्या लुटण टाऊन संघाने सुरवातीलाच दोन गोल खाले मात्र १४ व्य मिनिटाला कमबॅक करत कार्लटन मॉरिसने हेडर मारत फरक २-१ असा केला.

त्यानंतर पुढच्या वेळात सामन्यात दोन्ही संघाकडून गोल करण्याच्या समांतर संधी निर्माण करण्यात आल्या मात्र कोणताही संघ गोल करण्यात यशस्वी ठरला नाही. आणि सामना मँचेस्टर युनायटेड संघाने २-१ असा जिंकला


युनायटेडच्या सलग चौथ्या लीग विजयामुळे त्यांचे 25 सामन्यांतून 44 गुण झाले, जे चौथ्या स्थानावर असलेल्या ऍस्टन व्हिलापेक्षा ( Aston Villa F.C. ) पाच गुणांनी मागे आहेत.

युनायटेडने ऑगस्टमध्ये इटालियन क्लब अटलांटाकडून रॅस्मस होजलंडलां करारबद्ध करण्यासाठी 72 दशलक्ष पौंड ($90.71 दशलक्ष) रुपये दिले होते. मात्र हॉजलुंडला त्याचा पहिला प्रीमियर लीग गोल करण्यासाठी बराचसा वेळ लागला.

पण तो आता ट्रान्सफर फीची म्हणजे त्याच्यासाठी युनायटेड ने मोजलेल्या किमतीची परतफेड करत आहे, मॅनेजर एरिक टेन हॅगच्या ( Erik ten Hag ) युनायटेडला चॅम्पियन्स लीगसाठीच्या पात्रतेसाठीची दावेदारी मजबूत केली आहे.

टेन हॅग म्हणाले, "आम्ही त्याला त्याच्या दमदार कौशल्यामुळे संघात आणले आहे आणि त्यालाही माहीत आहे की तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, तो दबावाखाली चांगली कामगिरी करू शकतो, आणि मँचेस्टर युनायटेड संघाच्या आघाडीच्या ( striker ) ला त्या तुलनेच असणं आवश्यक आहे.

यानंतरचे सामने युनायटेड संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. चॅम्पियन्स लीग मध्ये पात्र होण्यासाठी युनायटेड संघाला स्पर्धा संपण्यापर्यंत पहिल्या ४ संघामध्ये राहणे आवश्यक आहे.



Updated : 20 Feb 2024 9:56 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top