केंद्रीय मंत्र्याकडून उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर
X
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्र्याने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
आधी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप विरोधकांना संपवत असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्र्याने थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
विरोधी पक्षाकडून सातत्याने भाजप लहान पक्षांना संपवत असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यावर प्रश्न विचारला असता भाजप लहान पक्षांना संपवत असल्याचा दावा खोटा आहे.
खासदार विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाच्या दिलेल्या ऑफरला काहीही अर्थ नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊ, अशी थेट ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.