पोलिस खात्याची इतकी नाचक्की कधीच झाली नाही: राम कदम
X
मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परमबीर सिंह यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात अनिल देशमुख हे सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट देत असल्याचं म्हटलं आहे. या पत्रानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
या पत्रात नंतर आता राजकीय वातावरण तापलं असून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाजप नेते राम कदम यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी केली आहे. राम कदम यांनी या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्राची बदनामी झाली असून मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असल्याचे म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार व त्यातील मंत्र्यांविरोधात गंभीर आरोप केले आहे.