परमबीर सिंह यांच्या वकिलाची राज्यसभेवर नियुक्ती
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Jun 2021 11:00 AM IST
X
X
देशातील अनेक हायप्रोफाईल केसेस हाताळणाऱ्या ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राष्ट्रपती नामनिर्देशीत खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक हाय प्रोफाईलमध्ये बाजू मांडली आहे. सध्या ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे वकील आहेत.
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेला 100 कोटीची वसूली करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसं पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. या आरोपानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.
सध्या या केसची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. त्याचे वकील महेश जेठमलानी आहेत. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे.
Updated : 1 Jun 2021 11:00 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire