Home > News Update > ''दरवर्षी १ कोटी ३ लाख टन उसाची चोरी'' राजू शेट्टींचा आरोप

''दरवर्षी १ कोटी ३ लाख टन उसाची चोरी'' राजू शेट्टींचा आरोप

दरवर्षी १ कोटी ३ लाख टन उसाची चोरी राजू शेट्टींचा आरोप
X

राज्यात दरवर्षी एक कोटी तीन लाख टन उसाची चोरी होते. यातून सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचा दरोडा कारखानदार (sugarcane factory) शेतकऱ्यांच्या मालावर टाकतात असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. पंढरपूर तालुक्यात रोकडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वजन काटा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज्यात यावर्षी सुमारे 196 कारखाने सुरू झाले आहेत. दरवर्षाला एक कोटी उसाची चोरी होते. त्यातून सुमारे साडेचार हजार कोटींचा डल्ला साखर कारखाने मारतात त्याला चाप लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी वजन काटे बसवण्यात येणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अगदी नाममात्र किंमतीमध्ये शेतकऱ्यांना वजन काटे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पुढील वर्षापासून प्रत्येक कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक्स काटे बसवावे असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एक रक्कमी एफ आर पी (FRP) देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर (Eknath Shinde) बैठक झाली होती. मात्र त्याचे आदेश न निघाल्याने कारखाने एक रक्कमी एफ आर पी देत नसल्याचं त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर स्थानिक आघाड्याकडून लढणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले..

Updated : 14 Jan 2023 12:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top