आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली लस
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 April 2021 7:46 PM IST
X
X
कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना लस देऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, 18 ते 44 वर्षापर्यंतच्या नागरिकांचेही लसीकरण सुरू करावे, या मागणीचा पुनरुच्चार आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केला.
फेब्रुवारीमध्ये टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याला हरवून ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रुजूही झाले. मात्र, लगेच त्यांना लस घेता येणे शक्य नसल्याने त्यांनी आता दोन महिन्यानंतर लस घेतली. यावेळी त्यांनी लस देणाऱ्या परिचारिका, जेजेचे डॉक्टर यांचे आभार मानले.
Updated : 19 April 2021 7:47 PM IST
Tags: rajesh tope Covid-19 vaccine
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire