Home > News Update > उत्तर भारतीयांची माफी मागा,अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही - खासदार ब्रिजभूषण शरणसिंह

उत्तर भारतीयांची माफी मागा,अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही - खासदार ब्रिजभूषण शरणसिंह

उत्तर भारतीयांची माफी मागा,अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही -  खासदार ब्रिजभूषण शरणसिंह
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आपण सहकाऱ्यांसह ५ जूनला अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केली होती.मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत.याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्येत घुसू देणार नसल्याच्या इशारा दिला आहे.

ब्रिजभूषण म्हणाले अयोध्येत येण्यापूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना हात जोडून माफी मागावी,माफी मागितल्याशिवाय त्यांना भेटू नये असा सल्ला ब्रिजभूषण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सल्ला दिला आहे.

राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काही संबंध नाही.राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेणयासाठी येणार आहेत.

भाजप खासदार ब्रिजभुषण शरणसिंह यांनी गुरवारी एका पाठोपाठ ट्विट करुन राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.उत्तरभारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांनी माफी मागावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.उत्तरभारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्याच्या सीमेत घुसू देणार नाही.अयोध्यात येण्यापूर्वी सर्व उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी ,असे ट्विट मध्ये म्हटले आहेत.

राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर बांधकामापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांनी सहभाग घेतलेला आहे. ठाकरे कुटुंबाचा त्याच्याशी काही देणे-घेणे नाही.

Updated : 5 May 2022 4:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top