राज ठाकरे यांचा आदेश वसंत मोरे यांच्यासाठी आहे का?
X
राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत वक्तव्य केल्यानंतर मनसेतील नाराजी चव्हाट्यावर आली. तर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर माध्यमांमध्ये वसंत मोरे चर्चेत आले. मात्र अखेर राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. तर हे पत्र वसंत मोरे यांच्यासाठी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत वक्तव्य केल्यानंतर राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. तर मनसेचे पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेशी विसंगत भुमिका घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे चर्चेत आले. मात्र वसंत मोरे यांनी माध्यमांमध्ये मांडलेल्या भुमिकेमुळे मनसेची मोठी अडचण झाली होती. मात्र या सगळ्या चर्चेवर वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही वसंत मोरे चर्चेत राहिले. त्यातच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माध्यमांसमोर न बोलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा आदेश वसंत मोरे यांच्यासाठीच असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे मनसेचे कार्यकर्त्यांनी योग्य पध्दतीने भुमिका न मांडल्याने राज ठाकरे यांचे आंदोलन फसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. तर मनसेच्या अधिकृत प्रवक्त्यांनीच पक्षाची भुमिका आणि राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याविषयी बोलण्याचे आदेश दिले आहेत. तर हा आदेश वसंत मोरे यांची माध्यमांमधील स्पेस कमी करण्यासाठीचा डाव असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांचा आदेश-
राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटरवरून पत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी... या पत्रकात मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याविषयी किंवा पक्षाच्या भुमिकेविषयी माध्यमांमध्ये भुमिका न मांडण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी
— Raj Thackeray (@RajThackeray) May 7, 2022
आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी... pic.twitter.com/Yf7spS4ccn