महायुतीत चौथा पक्ष, नव्या ठाकरेंची एंट्री ?
X
महायुतीत चौथा पक्ष सहभागी होणार आहे. महायुतीत नव्या ठाकरेंची एंट्री होण निश्चित झालंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचं कळतय अस म्हटलं आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या अर्धा तास चर्चा झाली त्यांनी दिल्ली येथे बैठक घेतली दरम्यान महायुतीत मनसेचा समावेश आणि जागा वाटपात चर्चा झाली. मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी अशा तीन जागांपैकी दोन जागांवर चर्चा झाल्याचं कळतेय अमित शाह यांनी राज ठाकरे यांना फडणवीस यांच्याशी चर्चा करून एक दोन दिवसात जागावाटप आणि महायुतीत येण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अस म्हणाले आहेत.
यावरून आता शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर निशाणा साधला आहे. "नरेंद्र मोदी यांना माहित आहे महाराष्ट्रात मोदी नावाने नाही तर ठाकरे नावानेच मतं मिळतात. त्यामुळे बाळा साहेबांचा फोटो चोरला. आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महायुतीतून मनसेला २ जागा मिळण्याची चर्चा आहे. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शकते आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दक्षिण मुंबई लालबाग परळ भागात नांदगावकरांचा चांगला प्रभाव आहे तर शिवसेना फुटीमुळे भाजप संख्याबळ वाढल आहे त्यामुळे दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर विजयी होऊ शकता अशी चर्चा आहे. तर दुसरी जागा नाशिक किंवा शिर्डी ची मिळण्याची शक्यता आहे. नाशिक मध्ये मनसेचा चांगला प्रभाव आहे. नाशिकमध्ये नगरपालिकेत मनसेची सत्ता होती आणि महापौर ही होता. २००९ मध्ये मनसेचे ३ आमदारही निवडून आले होते. सद्या नाशिक मध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे निवडून आले होते. या जागेवर अजित पवार आणि शिंदे गटानेही दावा केल्याने ही जागा मनसेला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज ठाकरे सोबत महायुतीत चौथ्या पक्षाची एंट्री होईल आणि राज ठाकरेंना त्याचा फायदा होईल अस वक्तव्य मंत्री. छगन भुजबळ यांनी केल आहे. तर राज ठाकरे यांच्या जाण्याने काहीही काहीही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी केलंय.