राज ठाकरे शेतकऱ्यांवर संतापले
जिल्हा बँकेच्या त्रासातून आम्हाला सोडवा, शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना घातले साकडे.
X
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीने कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणार बसत आहे. आधीच अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्ज भरण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे शेतकऱ्यांवर संतापले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे शेतकरी गडबडले.
राज ठाकरे म्हणाले "अडचणीच्या काळात माझ्याकडे येता. तुमची पिळवणूक करतात, त्यांना तुम्ही मतदान करता. याचं भान तुम्ही ठेवायला हव. अशा कडक शैलीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सवाल केल्याने काहीवेळासाठी उपस्थित शेतकरी अवाक् झाले. जिल्हा बँक सक्तीने कर्जवसुलीने शेतकरी त्रस्त झाला आहे. जिल्हा बँकेच्या त्रासातून आम्हाला सोडवा, असे साकडे शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना घातले. “आम्ही तुमच्यासोबतच राहू, अशी ग्वाही यावेळी शेतक-यांनी राज ठाकरे यांना दिली.
आम्ही कर्ज भरण्यास तयार आहोत. परंतु, त्यासाठी वेळ मिळायला हवा, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुम्ही आम्हाला मतदान करीत नसल्याबद्दलची नाराजी राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखविली. जे तुमची पिळवणूक करतात त्यांनाच तुम्ही मतदान करीत असल्याचे ठाकरे म्हणाले.