संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी मने चेतवणाऱ्या लोकशाहीरांची उणीव भासते - राज ठाकरे
X
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्याप्रमाणे मराठी मनांना चेतवण्याचे काम केले अशा शाहिरांची सध्या उणीव भासत असल्याची खंत व्यक्त करत राज ठाकरे (Raj Thakare)यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe)यांना अभिवादन केले आहे.
काय म्हटलंय राज ठाकरेंनी वाचा
लेखणीला हत्यार बनवून ज्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, वंचितांच्या व्यथा मांडत मराठी साहित्याचा दीपस्तंभ उभा केला ते अण्णाभाऊ साठे. अण्णांना लौकिक अर्थाने कोणतंही शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही पण तरीही त्यांनी लिहिलेलं साहित्य इतकं अद्वितीय की जगातील जवळपास २७ भाषांमध्ये त्या साहित्याचं भाषांतर झालं. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही अण्णांनी जनजागृतीचे जे प्रचंड काम केलं ते विसरता येणार नाही. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख ह्यांनी जशी मराठी मनं चेतवली तशी पुन्हा एकदा चेतवण्यासाठी अण्णाभाऊंची उणीव अधिकच भासते.
ह्या लोकशाहीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. राज ठाकरे