Home > News Update > भिडे वाडा स्मारकासाठी राज ठाकरे सरसावले

भिडे वाडा स्मारकासाठी राज ठाकरे सरसावले

भिडे वाडा स्मारकासाठी राज ठाकरे सरसावले
X

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष अभिवादन करत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ भारणार्‍या सावित्रीबाई फुले यांच्या भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक निदान पुढच्या जयंती पर्यंत पूर्ण करावे असे आवाहन केले आहे.


राज ठाकरे म्हणाले की, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडेवाड्यात रोवली. त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा सरकारने ह्या अधिवेशात केली, त्याचं स्वागतच. पण अशा घोषणा पुष्कळदा होतात. पण कृती शुन्य होते हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, अजून रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही, ह्याची काळजी घ्या. आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पहा.


राज ठाकरे यांनी आज सकाळी सावित्रीबाई फुले यांचा फोटो ग्राफिक करून सोशल मीडियावर शेअर केला होता.

नुकताच पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले होते. शासनाने बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली होती. सरकारनेही त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार, सावित्रीबाईंच्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करून लवकरच त्याचे पुनर्विकास होणार असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे.

राज ठाकरे आता मैदानात उतरल्यानंतर निदान प्रलंबित भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Updated : 3 Jan 2023 6:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top