मुंबई-गुजरात महामार्गावरील मालजीपाडा भागात साचले पावसाचे पाणी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Sept 2021 4:32 PM IST
X
X
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असल्याचे पाहायला मिळत आहे. जोरदार पावसानंतर मुंबई-गुजरात महामार्गावरील नायगाव वसई लगतच्या मालजीपाडा भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रोजच्या चाकरमान्यांना पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाट काढावी लागत आहे.यामुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत.
पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे एकीकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे तर दुसरीकडे पाण्यामुळे वाहने बंद पडण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
दरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे.संबंधित प्रशासनाने रस्त्यावर साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू केले असून लवकर वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
Updated : 1 Sept 2021 4:32 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire