#MumbaiRains : पुढील २ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
X
सध्या मुंबई, ठाणे जिल्ह्यासह राज्यभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शिवाय येत्या काही दिवसात राज्यभर पावसाची अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ञांनी नोंदवला आहे.
सध्या मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत जरी असला तरी त्याचा वेग मध्ये मध्ये मंदावत असवल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास वाट मिळत आहे. परिणामी मुंबई ठाण्यातील वाहतुक फक्त मंदावली आहे. लोकल सेवासुध्दा अगदी सुरळीत सुरू आहे. फक्त जे रोजचे हॉटस्पॉट आहेत त्याच ठिकाणी आपल्याला वाहतुक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. असं असलं तरी दिवसभर मुसळधार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे हवमान केंद्राचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी देखील मुसळधार पावसाची दिवसभर शक्यता असुन गरज असल्यास घराबाहेर पडावे अशा सुचना नागरीकांना दिल्या आहेत.
राज्यात देखील मुसळधार
पण एक लक्षात घेता सध्या पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस नाही. कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकताना अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि काही भागांत, नाशिक, शिवाय विदर्भात अकोला, अमरावती इत्यादी भागांत हलक्या सरींची नोंद झाली आहे. शिवाय पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. नंतरच्या काळात राज्यभरात विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे.