Home > News Update > थरारक : ट्रॅकवर पडलेल्या मुलाला रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले

थरारक : ट्रॅकवर पडलेल्या मुलाला रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले

थरारक : ट्रॅकवर पडलेल्या मुलाला रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले
X

रेल्वे ट्रॅक वर पडलेल्या लहान मुलाला एका रेल्वे कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवण्याचा प्रकार वांगणी रेल्वे स्टेशन येथे घडला आहे. मयुर शेळके असे या जिगरबाज रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तळवडे गावचा रहिवासी असलेले मयूर शेळके हे रेल्वे कर्मचारी वांगणी स्टेशनमध्ये पॉईंटमेंट म्हणून काम करतात. एक महिला आपल्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवरून जात असताना अचानक मुलगा रेल्वे रुळावर पडला आणि त्याचवेळी समोरून त्याच रेल्वे रुळावरून फास्ट ट्रेन येत होती. मयूर

यांच्या हे लक्षात येताच त्यांनी धावत जाऊन ट्रेक वरून त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर अडकले आणि स्वतः देखील काही क्षणांच्या आत प्लॅटफॉर्मवर आले त्यामुळे दोघांचाही जीव वाचला आहे मयूर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या चिमुकल्यांचे प्राण वाचविले त्यामुळे मयुरचे सर्वत्र कौतुक होतेय.

Updated : 19 April 2021 12:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top