Home > News Update > मुंबई : वडापावचे वाढले भाव!

मुंबई : वडापावचे वाढले भाव!

मुंबईतील रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत रेल्वे बोर्डाकडून वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक खाद्यपदार्थामागे पाच ते दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : वडापावचे वाढले भाव!
X

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या मुंबईकरांच्या खिसाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत रेल्वे बोर्डाकडून वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक खाद्यपदार्थांमागे पाच ते दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिसाला कात्री लागणार आहे.

याआधी रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर वडापाव नऊ रुपयांना मिळत होता. मात्र तोच वडापाव आता पंधरा रुपयांना मिळणार आहे. दहा रुपयांमध्ये मिळणारी भेळ आता 25 रुपये करण्यात आली आहे. एकीकडे कोराना संकटाने आधीच हतबल झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना या भाव वाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्याने सर्वसामान्यांमधून नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता रेल्वे बोर्डाकडून खाद्यपदार्थाची करण्यात आलेली ही भाव वाढ योग्य नाही, आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य मुंबईकर आर्थिक संकटात आहेत त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी सुयोग सावंत यांनी दिली आहे.

Updated : 28 July 2021 4:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top