रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह
X
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोना बाबत चिंता वाढवणारी बातमी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातुन पुढे येत आहे. येथील न्यू इंग्लिश स्कूल विन्हेरे शाळेतील 2 शिक्षकांसह 15 विद्यार्थी अशा 17 जणांना कोरोना तपासणी पॉझिटीव्ह आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 238 जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली होती. त्यातून हा अहवाल समोर आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी ही माहिती दिली असुन या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
या सर्वांना कोणतीही लक्षणे दिसत नसुन हे सर्वजण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. राज्यामधे कोरोनाचा संसर्ग वाढत असून काल मुंबईत 10 हजार 860 तर महाराष्ट्रात 18,466 कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या झाली आहे.