Home > News Update > दरडग्रस्त गावत लोकांनी कशी काढली रात्र?

दरडग्रस्त गावत लोकांनी कशी काढली रात्र?

दरडग्रस्त गावत लोकांनी कशी काढली रात्र?
X

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात तर महापुराचा धोका ठिकठिकाणी वाढत चालला आहे. आधीच रत्नागिरी आणि रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे.

रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त मृतांचा आकडा 60 वर पोहचला,महाड तालुक्यातील तलई 49 आणि तलई गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 49 मृतदेह आतापर्यंत आढळले आहेत. तर अनेकजण अजून बेपत्ता आहेत. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे.



दरड कोसळलेल्या गावांचा संपर्क तुटल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला पोहोचण्यासाठी अडथळे येत होते. सुतारवाडीला जोडणाऱ्या पितळवाडी - उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा उशिरा पोहोचली. मदत यंत्रणा पोहोचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये जरा धीर आला आहे. मात्र, या सगळ्या पावसाच्या तांडवाने लोकांच्या मनात अजुनही भीती कायम आहे. स्वत:च्या डोळ्याने पावसाचं तांडव पाहिलेल्या या लोकांशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी

Updated : 24 July 2021 4:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top