Home > News Update > Raigad Landslide | धक्कादायक ! इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली चिंताजनक माहिती

Raigad Landslide | धक्कादायक ! इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली चिंताजनक माहिती

Raigad Landslide | धक्कादायक ! इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली चिंताजनक माहिती
X

मुंबई – रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेतून ९८ जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे तर दुसरीकडे ८ जखमी ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या माहितीवरून एक धक्कादायक गोष्ट समोर आलीय.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीमध्ये १९ जुलैच्या मध्यरात्री दरड कोसळली होती. यामध्ये २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या वाडीमध्ये ४८ कुटुंब राहत असून त्यांची लोकसंख्या ही २२८ इतकी आहे. यापैकी सुमारे १७-१८ घरांवर ती दरड कोसळली होती. तातडीनं बचाव कार्य करत ९८ नागरिकांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आलंय. मात्र, २२८ लोकसंख्येच्या या वाडीतील उर्वरित १०९ जणांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची धक्कादायक माहितीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विशेष म्हणजे इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वैक्षण (Geographical Survey Of India) च्या अहवालानुसार संभाव्य दरजग्रस्त ठिकाणांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं.

इर्शाळवाडी इथल्या बचाव कार्यात यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, ३० चौक ग्रामस्थ, वरोसे ग्रामस्थ २०, नगरपालिका खोपोली यांचेकडील २५ कर्मचारी, चौक ग्रा. पं. कडील १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेल यांचेकडील १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींचा सहभाग आहे. तसेच NDRF च्या ४ टिम एकूण १०० जवान TDRF चे ८० जवान स्थानिक बचाव पथकाच्या ०५ टीम यांनी बचाव कार्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

Updated : 21 July 2023 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top