Home > News Update > राहुल गांधी पुन्हा ट्रोल, शिवजन्मोत्सवाच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

राहुल गांधी पुन्हा ट्रोल, शिवजन्मोत्सवाच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. महाराष्ट्र भाजपने राहुल गांधींचा निषेध करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केलीय. १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त राहुल गांधींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आणि श्रद्धांजली वाहिली.

शिवजयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिल्यानं त्यांना नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागतोय. अनेकांनी अक्षरशः राहुल गांधींना शिव्यांची लाखोली वाहत जोरदार टीकाही केलीय. तर दुसरीकडे महाराष्ट्र भाजपनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून राहुल गांधींच्या या पोस्टचा निषेध केलाय. महापुरूषांचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघडी पडत असल्याचं भाजपनं म्हटलंय.

Updated : 20 Feb 2025 10:35 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top