Home > News Update > "चुनाव खत्म लूट शुरू" राहुल गांधी महागाईच्या विरोधात रस्त्यावर

"चुनाव खत्म लूट शुरू" राहुल गांधी महागाईच्या विरोधात रस्त्यावर

चुनाव खत्म लूट शुरू राहुल गांधी महागाईच्या विरोधात रस्त्यावर
X

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक बडे नेत्यांनी आज महागाईविरोधात दिल्लीच्या संसद भवन परिसरात असलेल्या विजय चौकात आंदोलन केले. गेल्या 9 दिवसांत पेट्रोल च्या किंमतीत एकूण 5.60 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किंमती आणि महागाईविरोधात काँग्रेस पक्ष आज म्हणजेच गुरुवारी देशभरात निदर्शने करत आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सर्व नेते 'निवडणूक संपली लूट सुरू' अशा आशयाच्या घोषणा देत होते.

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बातचीत केली ते म्हणाले, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 9 वेळा वाढल्या असून त्याचा परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांवर होत आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले "गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डीझेलची किंमत वाढली आहे, याचा परिणाम मध्यम वर्ग आणि गरीब लोकांवर होत आहे. जोपर्यंत महागाई कमी होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. असा इशारा राहूल गांधी यांनी भाजपला दिला आहे. पाहा काय म्हणाले राहूल गांधी


Updated : 31 March 2022 12:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top