ममताजी भाजपचा दणदणीत पराभव केला अभिनंदन: राहुल गांधी
X
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर सर्व पक्षातील नेते ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा मिळवत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळवली आहे. ममता बॅनर्जी यांच्या या विजयानंतर राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.
मला तुमचं अभिनंदन करताना आनंता वाटतो. भाजपचा दणदणीत पराभव केल्याबद्दल ममताजी तुमचं आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं अभिनंदन. असं ट्वीट राहुल य़ांनी केलं आहे. असं राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I'm happy to congratulate Mamata ji and the people of West Bengal for soundly defeating the BJP.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 2, 2021
दरम्यान ममता बॅनर्जी यांनी या विजयानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपवर सडकून टीका केली.
काय म्हणाल्या ममता?
नंदीग्रामची काळजी करु नका. ते विसरा. संघर्षात काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं. नंदीग्राम टी जनता जो विचार करेल. त्याचा मी स्वीकार करेल. मला कसलीही भीती नाही. आपण 221 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत. आणि भाजप निवडणूक हारली. केंद्र सरकारने लाख प्रयत्न केले तर आम्ही मोठा विजय मिळवला आहे. हा विजय बंगाल आणि बंगालच्या जनतेचा आहे. बंगालच्या लोकांनी देशाला वाचवलं आहे. मी सांगितलं होतं आम्ही द्विशतक करणार... हा विजय बंगालच्या लोकांनी खेचून आणला. आम्ही सांगितलं होतं. को 'खेला हौबे', खेळ झाला आणि शेवटी आम्ही जिंकलो.
अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर दिली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराजय करण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या निवडणुकीत ममता यांच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. तरीही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव झाला नाही.