Home > Election 2020 > फाईलींना आग लावून मोदीजी तुम्ही वाचू शकणार नाही - राहुल गांधी

फाईलींना आग लावून मोदीजी तुम्ही वाचू शकणार नाही - राहुल गांधी

फाईलींना आग लावून मोदीजी तुम्ही वाचू शकणार नाही - राहुल गांधी
X

मंगळवारी (३० एप्रिल) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नवी दिल्लीतल्या शास्त्री भवन या शासकीय इमारतीला आग लागली होती. या इमारतीमध्ये विधी, माहिती व प्रसारण, सहकार मंत्रालय, रसायने आणि पेट्रोलिअम तसंच मुनष्य बळ विकास मंत्रालयाची कार्यालये आहेत. या आगीत जीवित हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. आगी मागचं कारण मात्र, अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, या घटनेनंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून आग लावून फाईली जाळून तुम्ही वाचू शकणार नाही. असं म्हणत राहुल गांधी यांनी या आगीमागे मोदींचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.

या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केले असून या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून ‘मोदीजी फाईलला आग लावून तुम्ही वाचू शकत नाही, असं म्हणत तुमच्या निकालाचा दिवस जवळ आला असल्याचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान जुलै २०१७ मध्ये ही अशाच प्रकारची आग शास्त्री भवनमध्ये लागली होती.

Updated : 30 April 2019 9:26 PM IST
Next Story
Share it
Top