Home > News Update > टीम इंडियाचा नवा हेड कोच राहुल द्रविड; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

टीम इंडियाचा नवा हेड कोच राहुल द्रविड; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

टीम इंडियाचा नवा हेड कोच राहुल द्रविड; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती
X

मुंबई // T-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात अनेक बदल होणार आहेत. कर्णधार कोहली T-20 संघाचं कर्णधारपद सोडणार आहे तर संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. BCCI ने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण, द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडची या पदासाठी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली.

द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी भारताने विजयही मिळवला होता. तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशा मागणी होत होती. मात्र, राहुल द्रविड हा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीच्या (National Cricket Academy) प्रमुख या पदावर असल्याने तो ही संधी घेत नव्हता. त्याला ज्यूनियर स्तरावरील खेळाडूंच्या निवडीसाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी काम करायचं असल्याने तो या पदावर होता. पण काही दिवसांपूर्वीच राहुलने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दिला. आता त्याची या जागी नियुक्तीही झाली आहे.

Updated : 3 Nov 2021 9:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top