युपीः अयोद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या घराबाहेरील भगव्या फलकाचा रंग हिरवा केल्याने अधिकारी निलंबित
X
सध्या देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश सर्वांचं लक्ष लागल आहे. अयोध्या निकालानंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होत आहे. त्यादरम्यान, अयोध्या जिल्हा अधिकाऱ्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्ची दिशा दर्शवणाऱ्या फलकाची चांगलीच चर्चा आहे.
सुरुवातीला हा फलक भगव्या रंगाचा होता. मात्र,हा भगव्या रंगाचा बोर्ड काढून हिरव्या रंगाचा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर 'भगवा' बोर्ड बदलते मौसम को देखते हुए 'हरा' कर दिया? अशा आशयाचे ट्वीट वायरल झाले होते.
सध्या अयोद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत निवासस्थानाचं काम सुरू आहे. त्यामुळे, अयोद्धाचे जिल्हाधिकारी सध्या PWD च्या गेस्ट हाउस मध्ये राहत आहेत. जिल्हाधिकारी ज्या गेस्ट हाऊस मध्ये राहतात. त्या गेस्ट हाऊस कडे जाण्याची दिशा दाखवणारा फलक एका ज्युनियर इंजीनियरच्या निर्देशानुसार बदलण्यात आला.
या अगोदरच्या फलकाचा रंग भगवा होता. तर, बदलण्यात आलेल्या फलकाचा रंग हिरवा होता. त्यामुळे ऐन निवडणुकीत फलक बदलण्यात आल्यानं सोशल मीडियावर राज्यामध्ये परिवर्तन होतं असल्यानं हा बदल होत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर ज्यूनियर इंजीनियर अजय शुक्ला यांना निलंबित करण्यात आलं आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार फलकाचा रंग पुन्हा एकदा भगवा करण्यात आला आहे. PWD चे प्रिन्सिपल इंजिनियर अरविंद कुमार श्रीवास्तव यांनी अजय कुमार शुक्ला यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. तसेच, या चौकशीमध्ये हा बोर्ड बदलतांना पूर्वकल्पना दिली नव्हती असं सांगितलं गेलं आहे.
जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी PWD कडून ही माहिती मागितली होती. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. तसेच, अमर उजालामधील वृत्तानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते अशाप्रकारे बोर्डच्या रंगाचा राजकारणाशी संबंध जोडणं योग्य नाही. PWD च्या फलकाचा रंग हिरवाच असतो. असं मत स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
सध्या अजय कुमार शुक्ला यांची "उत्तर प्रदेश सरकारी सेवक अनुशासन एवं अपील नियम 1999" नुसार चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान ते मुख्य अभियंता कार्यालय अयोध्येच्या संपर्कात राहतील. दरम्यान बदललेल्या या फलकाची देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.