Pushkar Jog: "२ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी
X
Pushkar Jog Post: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुष्कर जोगला त्याची जात विचारली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता पुष्करने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Pushkar Jog | मराठी अभिनेता पुष्कर जोग त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी तो रोज नवनवीन फोटो शेअर करत असतो. मराठी चित्रपटात तसेच मराठी मालिकांमध्ये त्यांने अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. फक्त सिनेसृष्टीतच नव्हे तर पुष्कर बिग बाॅसमधून घरा घरात पोहोचला आहे. दरम्यान, पुष्कर एका वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं समोर आलं होतं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने त्याला त्याची जात विचारली म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केली होती, ती तूफान व्हायरल झाली होती. त्यामध्ये पुष्कर जोग ने "बाईमाणूस नसत्या तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या", असं वक्तव्य केलं होत.पुष्कर जोगच्या त्या पोस्ट नंतर सोशल मिडियावर बराच गदारोळ माजला होता, अनेक जण संताप व्यक्त करत होते. यातच पुष्कर जोग ने आत्ता दिलगिरी व्यक्त करत दुसरी पोस्ट शेअर केली आहे.
@mybmc 🙏 @CMOMaharashtra sir pic.twitter.com/EKGq5dqHMe
— Pushkar Jog (@jogpushkar) January 29, 2024
पुष्कर जोगने BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी
अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत BMC कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. त्याने लिहिलं आहे,"मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी".