मोठी बातमी : चंदीगढ विद्यापिठात ८ मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, एकीची प्रकृती गंभीर
X
मोहालीच्या चंदिगड विद्यापीठातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विद्यापिठातील एका मुलीने आपल्या सहकारी मुलींचा आंघोळ करतानाचा न्यूड व्हिडिओ बनवून शिमल्यातील एका मुलाकडे पाठवला. त्या मुलाने नग्न व्हिडिओ व्हायरल केले. ही बाब मुलींना समजताच तब्बल ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
दुपारी अडीच वाजता मुलींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ पाठवणारी तरुणी आणि तो व्हायरल करणारा तिचा मित्र दोघेही हिमाचलचे आहेत. व्हिडिओ पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. दोषींना कडक शासन करण्यात येईल. हे प्रकरण फार संवेदनशील आहे. आमच्या भगिनी आणि मुलींच्या चारीत्र्याचा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रीया दिली आहे.
I humbly request all the students of Chandigarh University to remain calm, no one guilty will be spared.
— Harjot Singh Bains (@harjotbains) September 18, 2022
It's a very sensitive matter & relates to dignity of our sisters & daughters.
We all including media should be very very cautious,it is also test of ours now as a society.
चंदिगड विद्यापीठ व्यवस्थापनावर आरोप
विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनींना वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आले. हे प्रकरण दडपण्यासाठी चंदिगड विद्यापीठ व्यवस्थापन विद्यार्थ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. रात्री अडीचच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. मात्र, रागाच्या भरात मुली पोलिसांवरही आवाज चढवला. त्यांनी पोलिसांना विरोध करत त्यांच्या वाहनांची तोडफोडही केली. सध्या चंदीगढ विद्यापिठातील कॅम्पसमधील वातावरण तणावपूर्ण आहे.